कामाच्या प्रचंड व्यापात कार्यकर्त्या मार्फत एक बातमी समजली अन् मी पूर्णपणे थबकलो. विषय होता दीपक या अडीच वर्षाच्या लेकराचा! दीपक एक वर्षाचा असताना त्याच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला. लहानग लेकरू आईच्या मायेला पोरक झालं. यानंतर त्याचे वडील विलास कोंढाळकर हे त्याचा संभाळ करत होते. आई नसलेल्या लेकराची आई अन् बाप दोन्ही भूमिका विलास हेच पार पाडत होते. आईला जाऊन काही वर्ष उलटत नाही तोच आणखी एक काळा दिवस उजाडला. श्री. विलास कोंढाळकर रात्री कामावरून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला अन् यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच आईला पोरक झालेलं लेकरू आता बाप नावाच्या आभाळाला देखील पोरक झालं.
एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन दीपक साठी काय करता येईल याबाबत सारखी मनात चलबिचल सुरू होती. अखेर नुकतच त्याच भोर तालुक्यातील पान्हवळ गावातील घर गाठल अन् सर्व परिस्थिती जाणून घेतली. सद्या दीपक त्याच्या आजी सोबत राहतोय. कुटुंबाला मानसिक आधार दिलाच पण दीपक ची यापुढील सर्व शैक्षणिक जबाबदारी आपण स्वीकारली आहे. आयुष्यात त्याच्या सर्व सुख दुःखात त्याची सोबत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. दीपक ला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळेल, तो सुजाण नागरिक बनेल यासाठी त्याच्या पाठी मी भक्कमपणे उंजा राहील हा शब्द त्याच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी माझे सहकारी अप्पासाहेब चोंधे, रोहन भोसले उपस्थित होते.
रंजल्या गांजल्यांची सेवा करण्याचा धर्म आपली संस्कृती शिकवते हाच धर्म पाळताना मनाला कमालीचं समाधान लाभल. दीपक च पुढील आयुष्य सगळ्या संकटापासून दूर राहो, त्याच उज्वल भविष्य घडो यासाठी आपण सर्व प्रार्थना करूयात.
