Skip to content

सामाजिक कार्य

  • by

भोर तालुक्यातील निगुडघर खोऱ्यातील धरण पट्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्हा परिषद शाळा दापकेघर, कंकवाडी येथील शाळेत पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच आपल्या टीम ने संबंधित शाळा गाठत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यानंतर मी स्वतः जाऊन तेथील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास आदी शालेय साहित्याचे वाटप केले. या भेटीने चिमुकल्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहताना दिसला. यामुळे केलेल्या कार्याचं समाधान देखील लाभल. यापुढे देखील कुठल्याही अडचणीत मी ठाम उभा राहील, फक्त शिक्षण थांबता कामा नये असा विश्वास मी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांनी देखील आम्ही प्रामाणिकपणे आता आणखी अभ्यास करू अस वचन मला दिलं. यावेळी माझ्या सोबत अमर बुद्गुडे, अप्पासाहेब चोंधे, भरत गुड्डमवार, नितीन कानगुडे, सचिन देशमुख, तुषार धोटे, समीर देशमुख, नथुभाऊ कंक, महिपती धानवले आदी सहकारी उपस्थित होते. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत