बहिण भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण लवकरच येतोय. या पार्श्वभूमीवर भोर विधानसभा मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणीच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत. जन आशीर्वाद यात्रेचा पहिला दिवस पार पडला. यात मुळशी तालुक्यातील नेरे ,जांबे ,कासारसाई ,माण, मारुंजी, हिंजवडी या गावांतील महिला भगिनींचा आशीर्वाद घेतला. यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहाने माझं स्वागत केलं. या बहिणींच्या हातून राखी बांधून घेताना त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे ठोस आश्वासन मी देखील त्यांना दिलं. निर्णय कुठलाही असो आम्ही सर्व महिला तुमच्या पाठी भक्कम उभ्या आहोत असा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला. ही जन आशीर्वाद यात्रा मला पुढील वाटचालीसाठी मोठं बळ देईल असा विश्वास आहे. सर्व माय – बहिणींचे आभार!
