Skip to content

भोर ते मांढरदेवी घाट रस्ता एकेरी वाहतूक सुरू करावी.

  • by

गेली सहा महिने भोर ते मांढरदेवी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे भोर तालुक्यातील स्थानिक प्रवासी वाहतुक करणारे व्यावसायिक असतील त्याचबरोबर पर्यटनावर आधारित व्यवसाय करणारे हॉटेल व्यावसायिक असतील यांचा व्यवसाय गेली सहा महिने बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

एकतर तालुक्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून जे लोक छोटा मोठा व्यवसाय करून उपजीविका करत आहेत. त्यांचे देखील व्यवसायावर गदा आली आहे. लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा किंवा तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतुक तरी सुरु करावा ही मागणी घेऊन आज सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. अधिकाऱ्यांनी देखील या मागणीवर सकारात्मक विचार करू असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत