अडीच हजार महिला झाल्या अंबाबाई अन् संत बाळूमामा चरणी लीन
भोर, मुळशी, राजगड(वेल्हे) तालुक्यातील २५०० महिलांना ५० बस मार्फत घेऊन नुकतेच कोल्हापूर मध्ये अंबाबाई अन् संत बाळूमामा चे दर्शन घेतले. प्रत्येक रविवारी निघणाऱ्या अध्यात्मिक यात्रेचा हा भाग होता. अंबाबाई, संत बाळूमामा दर्शन झाल्याचं मोठं समाधान महिलांच्या चेहऱ्यावर दिसल. जनतेच समाधान हाच माझा आनंद आहे. यावेळी अनेक महिलांनी माझ्या अध्यात्मिक कामाबाबत माझं तोंड भरून कौतुक केलं. उपस्थित सर्वच महिलांनी भोर विधानसभा मतदार संघासाठी मी आखत असलेल्या विकासात्मक धोरणाबाबत माझ्या पाठी उभ राहण्याचा शब्द दिला.
