काशीयात्रा अन् सोमवती अमावस्या साधला योग
तीन हजार यात्रेकरूंच्या साक्षीने केली गंगा आरती
भोर विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आयोजित मोफत काशीयात्रा नुकतीच पार पडली. चौथ्या टप्यातील या यात्रेसाठी खडकी रेल्वे स्टेशन वरून प्रस्थान केले. जवळपास तीन हजार नागरिकांना घेऊन काशी तीर्थक्षेत्रावर भेट दिली. येथे काशी विश्वनाथ तसेच कालभैरवाचे दर्शन घेऊन सामूहिक गंगा आरती केली. एकच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या सामूहिक गंगा आरतीने भक्तीमय वातावरण तयार झाले. आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा घडावी हे अनेक लोकांचं स्वप्न माझ्या मार्फत पूर्ण होताना बघून त्यांच्यासमवेत मला देखील अध्यात्मिक अन् मानसिक समाधान लाभल. काशी येथील गंगा सेवा निधी संस्थेने यावेळी माझा विशेष सत्कार केला. संपूर्ण रेल्वे प्रवासात कुणाचीही गैरसोय होणार नाही याकडे स्वतः जाणीवपूर्वक लक्ष दिले. या संपूर्ण उपक्रमात माझे सहकारी मित्रांचं उत्तम नियोजन कामी आल. उपक्रमात सहभागी होणारे तसेच या उपक्रमाचं यशस्वी नियोजन करणाऱ्या सर्व मित्रांना मनस्वी धन्यवाद देतो. काशी विश्वनाथ, कालभैरवाचे आशीर्वाद आणि माय बाप जनतेची खंबीर साथ या जोरावर समाजसेवेचा हा वसा इथून पुढेही असाच सुरू राहील.
