भोर विधानसभा मतदार संघातील भोर तालुक्यातील बहुप्रतिक्षित औद्योगिक वसाहतीला(MIDC) चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस आणि माझे मार्गदर्शक मा. मंत्री श्री. रावसाहेबजी दानवे पाटील साहेबांची भेट घेतली.
रखडलेल्या उत्रौली औद्योगिक वसाहतीबाबत त्यांना माहिती दिली. भोर विधानसभा मतदार संघात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी असून त्यांच्या हाताला काम मिळण्याची आवश्यकता आहे. पोटा- पाण्यासाठी अनेक तरुण मोठ्या शहरात स्थलांतरित होत असून मिळेल ती नोकरी करत आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा थेट परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवर होत असून हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न गेली कित्येक वर्ष तसाच प्रलंबित असून हा लवकरात लवकर मार्गी लागावा अशी कळकळीची विनंती मी साहेबांना केली. या दृष्टीने येथे औद्योगीक वसाहतीस (MIDC) चालना मिळायला हवी अशी मागणी केली. या प्रश्नावर लवकरच सकारात्मक पावले उचलू असा शब्द यावेळी साहेबांनी दिला.
