Skip to content

यात्रा ४थी

  • by

यशस्वी तीन यात्रेनंतर आज भोर विधानसभा मतदार संघातील दोन हजार महिला महालक्ष्मी, बाळूमामा चरणी लीन

यशस्वी तीन धार्मिक यात्रेनंतर आज शनिवारी पुन्हा एकदा कोल्हापूर येथील अंबाबाई आणि संत बाळूमामा दर्शन यात्रा पार पडली. मागील तीन यात्रेत भोर विधानसभा मतदार संघातील हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला. ह्यावेळी ४० बस मार्फत भोर, मुळशी, राजगड तालुक्यातील सुमारे २ हजार महिलांनी या यात्रेत सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारा प्रतिसाद म्हणजे माझ्या कार्यावर आपण सर्वांनी टाकलेला विश्वासच म्हणावा लागेल. हाच विश्वास कायमस्वरुपी अबाधित राहो हिचं आई अंबाबाई आणि संत बाळू मामा चरणी प्रार्थना!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत