Skip to content

काशीयात्रा

  • by

भोर विधानसभा मतदार संघातील तीन हजार नागरिकांना नुकतीच काशीयात्रा घडवली. संपूर्ण रेल्वे यासाठी आरक्षित करण्यात आली होती. खडकी ते काशी आणि काशी ते खडकी प्रवासात यात्रेकरूंची कुठलीही गैरसोय होणार नाही याची सगळी काळजी माझ्या स्वयंसेवकांनी घेतली. या यात्रेकरूंचे आगमन नुकतेच खडकी रेल्वे स्टेशनवर झाले तेव्हा त्यांचं सहकुटुंब स्वागत केले. यात्रेबद्दल उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिल्या. काशीयात्रा घडल्याचं अध्यात्मिक समाधान यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत. आपण राबवत असलेल्या उपक्रमाविषयी लोक आनंदी, समाधानी तेवढेच आपल्या सोबत काम करण्यास उत्साही आहेत. आपल्या भोवतालची हि जणमाणसांची गर्दीच आपली ऊर्जा अन् श्रीमंती आहे अस मी मानतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत